New Voter id Card Online Apply 2025-26 Maharashtra New Process – नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि, वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड नवीन मतदान कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर हि माहिती खूप महत्वपूर्ण आहे. आणि आपण हि माहिती पाहून तुम्ही मतदान यादीमध्ये नाव लावू शकता, आणि तुमचं मतदान कार्ड हे पोस्टाने तुम्हाला भेटून जाईल. मतदान कार्डची प्रोसेस थोडीशी बदललेली आहे, परंतु आता नवीन पद्धतीने ई साईन पद्धत आलेली आहे. आपला आधार नंबर जो आहे, तो कंपलसरी करण्यात आलेला आहे. आता नवीन पद्धतीने मतदान यादीमध्ये नाव कसं लावायचं म्हणजेच, मतदान कार्ड कसं काढायचं हि माहिती आपण पाहणार आहोत.

New Voter id Card Online Apply 2025-26 ( नवीन मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज २०२५-२६ )
- तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायच आहे, ( https://voters.eci.gov.in/ )
- या वेबसाईटवरती आल्यानंतर यामध्ये आपल्याला लॉगिन आणि साईन अप हे दोन ऑप्शन इथे दिसतील.
- यावरती अकाउंट असेल तर तुम्ही लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करा अकाउंट नसेल तर इथे साईन अप या बटनावरती क्लिक करा.
- इथे आता आपण अकाउंट उघडून घेणे व साईन अप या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अकाउंट उघडण्यासाठी मोबाईल नंबर विचारला जाईल.
- तुमचा तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, तो इथे टाकायचा आहे. ईमेल ऍड्रेस ऑप्शनलला आहे असेल तर टाका नाहीतर सोडून द्या. त्यानंतर कॅप्चा आहे, या वरती ज्या बॉक्स मध्ये कॅप्चा दिसतोय तो आहे.
- तस टाकून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारला जाईल, त्यामध्ये तुमचं जे काही फर्स्ट नेम आहे, तुमचं नाव टाका तुमचं लास्ट नेम तुमचं आडनाव टाका आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करा.
- तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकायचा आहे. सहा डिजिटचा आणि ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायच आहे. एकदम सोपी पद्धत आहे, नंतर तुम्ही व्हेरिफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता.
- अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली झालेलं असेल. आता लॉगिन करायचंय लॉगिन बटनवरती क्लिक करायच आहे. नंतर लॉगिन याऑप्शन वरती येऊ शकता अकाउंट उघडलय आता आपल्याला फक्त आपला मोबाईल नंबर इथे विचारलाय लॉगिन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- कॅप्चा बॉक्स मध्ये आहे तसं दिसतय तसं खाली कॅप्चा मध्ये आहे. तसं टाकायच आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायच आहे. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल. जो काही ओटीपी आहे, तो रजिस्टर नंबर वरती जाईल. तो ओटीपी इथे टाकायचा आहे.
- आणि व्हेरिफाय अँड लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायच आहे. लॉगिन झालेल तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने हे कट करायच आपल्याला कट केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल यामध्ये आता नवीन यादीमध्ये नाव लावायच नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी डाव्या साईडला यायच आहे. डाव्या साईडला तुम्हाला पर्याय दिसेल न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स मध्ये इफ यू आर 18 इयर्स म्हणजे 18 वर्षाचे असेल किंवा 18 पेक्षा जास्त वर्षा तुम्ही असाल एज तुमचं वय असेल तर तुम्ही हा फिल फॉर्म सिक्स वरती क्लिक करायच आहे.
- तर आपल्याला नवीन यादीमध्ये लावण्यासाठी फिल फॉर्म सिक्स वरती क्लिक करायच आहे. आणि फॉर्म सिक्स हा तुमच्यासमोर ओपन होईल. ज्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र स्टेट आपल सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही जिल्हा असेल तो ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे.
- त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला नाव लावायचे ते मतदारसंघ विचारला जाईल. मतदारसंघ तुम्हाला जर माहित नसेल तर घरातील मोठी व्यक्ती कोण असेल त्यांना विचारा की तुमचा मतदारसंघ काय आहे, तो मतदारसंघ इथे निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथे नेक्स्ट बटन दिसेल. या नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आहे. त्यानंतर बी पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम म्हणजे काय टाकायचं तुम्हाला पहिलं नाव तुमचं नाव टाकायच आणि स्पेस देऊन तुम्हाला मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांच नाव टाकायचं आहे.

- हे नाव स्पेस तुमच्या वडिलांच नाव अशा पद्धतीने टाका त्यानंतर आडनाव सरनेम आडनाव टाकायच आहे. त्यानंतर मराठी मध्ये इथे ऑटोमॅटिकली खालच्या दोन्ही बॉक्स मध्ये येऊन जाईल. त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे. चूज फाईल वरती क्लिक करायच आहे. नंतर तुम्हाला आपला फोटो 2 MB च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे.
- आपण तुम्हला फोटो अपलोड करणार असाल तर हा आपल्याला क्रॉप करायचा असेल तर क्रॉप करू शकता. आणि सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर चष्मा वगैरे घालू नका. टोपी वगैरे घालू नका ह्युमन फेस डिटेक्ट सक्सेसफुली तर इथे पहा आपला फोटो घेतलेला आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर नेम अँड सरनेम एनी अदर रिलेटिव्ह जे काही रिलेटिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या मतदान कार्ड वरती तुमच्या वडिलांच नाव लावायचं का आईचं नाव लावायचं का हजबंडच नाव आहे, का वाईफच जे काही नाव लावायचं असेल किंवा पेरेंटच ते दिलेले आहे.
- तुम्हाला फादरच नाव लावायचं असेल हजबंडच वाईफच मदरच जे काही नाव लावायच असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कोण लावायच त्यानुसार तुम्ही इथे पर्याय निवडा वाईफ असेल हजबंड असेल मदर असेल फादर असेल त्यापैकी एक निवडा, आणि त्यानंतर नाव आणि आडनाव टाकायचं फादरच नाव वडिलांच नाव आणि आई वडिलांच आडनाव त्यानंतर मराठी मध्ये ऑटोमॅटिकली येईल. ते चेक करून घ्या खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा नेक्स्ट केल्यानंतर डी कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर यायचा आहे.
- सेल्फ जो बटन आहे, त्यावरती क्लिक करायच टिक करून त्या बॉक्स मध्ये आपल्याला जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे, तो व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आहे. नंतर मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट केल्यानंतर नंतर ईमेल आयडी आहे, ईमेल आयडी टाकायची काही गरज नाही. मोबाईल नंबर टाका नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इ आधार डिटेल्स आहे.
- आधार नंबर इथे आपल्याला टाकायच आहे. आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर एफ जेंडर मेल आहे, का फिमेल आहे कुणाचा आहे तुमचं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. मेल असेल फिमेल असेल नंतर नेक्स्ट करायच आहे.

- जस तुम्ही नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक कराल त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारली जाईल. ज्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करायचे आहे, डे मंथ इयर जसं असेल तस व्यवस्थित रित्या तुमची आधार कार्ड वरती जशी जन्मतारीख आहे, तशी जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे.
- तर तम्ही जन्मतारीख सिलेक्ट करणं घेतल्या त्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ डॉक्युमेंट सपोर्टिंग एज प्रूफ अटॅचमेंट जे काही तुमचे डॉक्युमेंट आहे. त्याचे झेरॉक्स काढा आणि त्या झेरॉक्स वरती सही करायचे जे काही कागदपत्र देणार आहे.
- तुम्ही त्यावरती सही करायचे आहे, समजा तुम्हाला आता इथे बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स दहावी बाराच मार्कशीट इंडियन पासपोर्ट यापैकी एक तुम्ही देऊ शकता. ज्यावरती तुमची जन्मतारीख मेन्शन पाहिजे, तर आता आधार कार्डची झरोक द्यायची असेल, आधार कार्डची झरोक द्यायची आणि चूज फाईलवरती क्लिक करून 2 एb च्या आतमध्ये हे तुम्ही अपलोड इथे करू शकता.
- अपलोड केलेला आहे, दोन एमबीबी च्या आतमध्ये फक्त त्याची झेरॉक्स वरती तुमची सही असणं गरजेच आहे. नंतर नेक्स्ट करायच नेक्स्ट केल्यानंतर आता प्रेझेंट ऍड्रेस ऍड्रेस आता ज्या ठिकाणी तुम्हाला नाव लावायच त्या ठिकाणचा तुम्हाला ऍड्रेस विचारला जाईल.
- हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट नंबर जर असेल तो इथे टाका त्यानंतर मोहल्ला वार्ड वगैरे काय असेल ते गावाचं नाव विलेज टाऊन इथे गावाचं नाव मराठीमध्ये ऑटोमॅटिकली इथे येईल त्यानंतर पोस्ट ऑफिस इथे विचारल पोस्ट ऑफिस टाका. पिनकोड विचारलाय तुमचा पिनकोड गावाचा टाका तहसील तालुका जे असेल मंडळ ते टाका. ऑटोमॅटिक मराठीत येईल. त्यानंतर तूम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करा.
- त्यानंतर आता डॉक्युमेंट डॉक्युमेंट फॉर प्रूफ रेसिडेंट यावरती क्लिक करा. सिलेक्ट डॉक्युमेंट यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे, आधार कार्ड वॉटर बिल पासबुक नॅशनलाईज बँकेचा पासपोर्ट सातबारा असेल किंवा रेंट लिस्ट डीड असेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आहे. आपण आधार कार्ड सुद्धा इथे देऊ शकता. फक्त आधार कार्डवरती सुद्धा मतदान कार्ड होऊन जाईल.
- त्यानंतर मग नॅशनलाईज बँकेचे पासबुक त्यावरती तुमचा ऍड्रेस पूर्णपणे पाहिजे दोन एमबी च्या आतमध्ये तुम्ही मोबाईल मधून फोटो काढू शकता.
तुम्ही अपलोड करू शकता. तर आपण पासबुक अपलोड केलेला आहे. तुम्हाला आधार कार्ड करायचा असेल, तर आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर खाली ऍड्रेस टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आहे. - त्यानंतर डिसेबिलिटी जर कोणी अपंग व्यक्ती असेल तर तो कशामध्ये अपंग आहे, परसेंटेज किती आहे, सर्टिफिकेट आहे, का अपंगाच असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचं नसेल, तर हे ऑप्शन सगळे सोडून द्या. अपंग नसेल तर डायरेक्टली तुम्हाला नेक्स्ट करायचं काही लिहायचं नाही. त्यानंतर खाली तुम्हाला फॅमिली मेंबर जर मतदान कार्ड कोणाचं घरात असेल तर त्या व्यक्तीचं नाव तो व्यक्ती तुमच्याशी कोण लागतो.
- रिलेशन फादर मदर हजबंड आणि त्या व्यक्तीचा मतदान कार्डचा नंबर टाकू शकता. असेल तर टाका नाहीतर हा ऑप्शन सोडून द्या. डायरेक्टली खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन विचारलं डिक्लेरेशन मध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या समजून घ्या पहिला आहे, आय एम सिटीजन ऑफ इंडिया प्लेस ऑफ माय बर्थ इज जिथे जन्म झाला तुमच्या त्या ठिकाणच गावाचं नाव त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करा.
- ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणच जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर जो काही ऍड्रेस आहे, तो तुम्हाला ऍड्रेस वरती किती वर्ष झाल तुम्ही राहता आहे, ते सिन्स द्यायच सिन्स म्हणजे महिना आणि वर्ष महिना आणि वर्ष तुम्हाला द्यायच महिना आणि वर्ष द्यायच म्हणजे जो ऍड्रेस तुम्ही वरती टाकलेला आहे. त्या ऍड्रेस वरती तुम्ही कधीपासून राहत आहात, त्या महिना आणि वर्ष तुम्हाला इथे टाकायच आहे.
- तर इथे टाकून घेतल्यानंतर खाली यायचं खाली प्लेस प्लेस म्हणजे तुमच्या गावाचं नाव किंवा शहराच नाव जे असेल ते त्यानंतर खाली सगळी माहिती भरून नेक्स्ट करायचं आहे. नंतर तुम्ही नेक्स्ट केलं तर आता शेवटचा ऑप्शन येतो. तो म्हणजे कॅप्चा बॉक्स मध्ये कॅप्चा दिसतोय तो आहे तसा टाकायचा आणि पुढे सेंड ओटीपी वरती क्लिक करायच आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावरती ओटीपी येईल, तो ओटीपी इथे टाकून प्रिव्ू अँड सबमिटचा ज काही बटन आहे, निळ्या रंगाच त्यावरती क्लिक करायच आहे.
- सगळी माहिती बरोबर आहे, का एकदा चेक करायची आहे. प्रिव् सबमिट केल्यानंतर हा फॉर्म ओपन येईल. ज्यामध्ये तुम्ही माहिती भरलेली बरोबर आहे, का बरोबर असेल तर तुम्हाला पुढे जायच नाही. तर कीप एडिटिंग करू शकता ई साई अँड सबमिट बरोबर असेल, तर ई साई अँड सबमिट हा नवीन ऑप्शन आलेला आहे. ई साई अँड सबमिट वरती क्लिक करायचय यस करायचय आता हे नवीन एक पेज ओपन होईल.
- पहिल्यांदा हे असं नव्हतं आता आलेल आहे. इथे तुम्हाला कंपलसरी आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर टाकायचा, आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायच आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल.
- तो ओटीपी इथे टाकायच आहे. आणि टर्म्स अँड कंडीशन इथे एक्सेप्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करायच आहे. हे एक ई साई च जे पेज आहे. ते आता इथे वाढवण्यात आलेले आहे. आपल्याला ई साई करण इथे कंपलसरी करण्यात आलेले आहे.
- तर ते पहा सबमिट केल्यानंतर आपली कनॉलेजमेंट स्लिप येईल. डाऊनलोड कनॉलेजमेंट स्लिप आणि एक रेफरन्स नंबर आहे. हा रेफरन्स नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हा रेफरन्स नंबर कुठेतरी कॉपी करून ठेवा. आणि जी प्रिंट आहे. ती सुद्धा डाऊनलोड करून ठेवा.
- तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आता याच पाहू शकता. आता हा रेफरन्स नंबर आहे, हा रेफरन्स नंबर आपल्याला लागणार आहे. का लागणार ते सांगतो आपल्याला स्टेटस पाहण्यासाठी लागणार आहे.
- तुम्हाला हा फॉर्म जपून ठेवा आहे. याच्यावरती रेफरन्स नंबर आहे, तो सुद्धा आपल्याला लागेल काय काय माहिती भरली तुम्हाला ती तुम्हाला दिसेल. त्यानंतर काही दिवसांनी 10 ते 15 दिवसांने तुम्ही इथे येऊन आपल स्टेटस चेक करायच आहे.
- कारण इथे ऑप्शन आहे कि, ट्रॅक प्लकेेशन स्टेटस आपल मतदान कार्ड झालय का नाही ते पाहण्यासाठी ट्रॅक प्लिकेशन सेट वरती क्लिक करा. आपला रेफरन्स नंबर टाकून सबमिट करा. आपल्याला नाव वगैरे तुमची माहिती दिसेल, आणि स्टेटस करंट दाखवेल, आता मी सबमिट केलेल आहे.
- त्यामुळे आता सबमिटेड दाखवते काही दिवसांनी याचा स्टेटस चेंज होईल, आणि बीओला अपॉईट होईल तुमचे डॉक्युमेंट चेक करून तुमचा मतदान कार्ड नंबर इथे पडणार आहे.
करंट स्टेटस सबमिटेड आहे, थोड्या दिवसांनी तुम्हाला बाण दिसेल. पहा त्या बानावरती क्लिक केल की स्टेटस दाखवतो. सबमिटेड काही दिवसांनी तुमचं इथे दाखवेल मतदान कार्ड दाखवेल मतदान कार्ड नंबर दाखवेल. - तुमचं नाव लागल दाखवेल तर इथे मतदान कार्ड जो नंबर इथे दाखवेल. नंतर तो नंबर कॉपी करायचा आणि मतदान कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता. ते कुठून डाऊनलोड करू शकता तर आपल्याला पेज आहे.
- पहा इक डाऊनलोड चा पर्याय ईपीक डाऊनलोड याच्याखाली तिथे आपला जो काही मतदान कार्ड नंबर आहे. तो टाकून महाराष्ट्र सेटवर करून ओटीपी च्या माध्यमातून मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता.
- अशा पद्धतीने मतदान यादीत नाव लावू शकता तुमचं मतदान कार्ड सहा महिन्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल.

Documents required to apply for new voter ID card online 2025-26 ( नवीन मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे २०२५-२६ )
✅ आवश्यक कागदपत्रे
-
ओळखपत्र (Proof of Identity):
-
आधार कार्ड
-
पॅन कार्ड
-
ड्रायव्हिंग लायसन्स
-
पासपोर्ट
-
बँक पासबुक (फोटोपासून)
-
रेशन कार्ड
-
विद्यार्थी ओळखपत्र
-
शाळेचे प्रमाणपत्र (SSLC/10वी)
-
आधार कार्डवरील QR कोडसह ई-आधार
-
-
पत्ता पुरावा (Proof of Address):
-
बँक/पोस्ट ऑफिस पासबुक
-
रेशन कार्ड
-
ड्रायव्हिंग लायसन्स
-
इलेक्ट्रिसिटी/पाणी/गॅस बिल
-
पोस्टाने आलेला पत्र
-
भाडे करारनामा
-
आधार कार्डवरील पत्ता
-
-
वय पुरावा (Proof of Age):
-
आधार कार्ड
-
पॅन कार्ड
-
ड्रायव्हिंग लायसन्स
-
पासपोर्ट
-
शाळेचे प्रमाणपत्र (10वी/8वी/5वी)
-
जन्म प्रमाणपत्र
-
-
ताजे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (Recent Passport-sized Photograph):
-
अर्जासोबत अपलोड करण्यासाठी.
-
Read More – New Voter id Card Online Apply 2025-26 Maharashtra New Process
Conclusion
तर मित्रानो आपणास मी असे सांगू शकतो कि ह्या मध्ये जी माही दिली आहे. New Voter id Card Online Apply 2025-26 Maharashtra New Process ती संपूर्ण आम्ही नवीन वोटर कार्ड तुम्ही घरी बसून कसे काढू शकता ह्या बद्द्दल दिली आहे. तर आपण असे सांगू शकतो कि ह्या मध्ये जी आवश्यकत लागणारी कागद पत्रे आहेत ती, फरक सुद्धा असू शकतात, कारण कोणी ग्रामीण किंवा शहरी भागात सुद्धा राहतो, म्हणून मी आपणस असे सांगू शकतो कि, तुम्ही ज्या भागात राहत असाल त्या नुसार तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत. माझी एवढीच विनंती आहे कि, तुम्हाला जर हा फॉर्म भरता आला नाही तर, तुम्ही महा ई सेवा केंद्र मधून भरू शकता.
