Ladki bahin eKYC answers to your questions – नमस्कार लाडक्या बहिणींनो तर आज आपण पाहणार आहोत कि, लाडकी बहिण योजनेची ई केवायसी, आपणास असे सांगू शकतो कि लाडकी बहिण योजनेची ई केवायसी सुरू झालेली आहे. परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची अजून केवायसी झालेली नाही. त्यांच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत, ते जे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहे.
Ladki Bahin eKYC answers to your questions ( लाडकी बहीण eKYC तुमच्या प्रश्नांची उत्तरे )
या वेबसाईट वरती भरपूर सर्वर लोड आहे. त्यामुळे वेबसाईट चालत नाही, वेबसाईटच काम चालू आहे त्यामुळे कधी कधी वेबसाईट बंद असते. तर आता याच्यावरती उपाय तर काय आहे. तर तुम्हाला भरपूर घाई असेल, तर तुम्ही ही केवायसी रात्रीचं 12 एक नंतर करू शकता किंवा पहाटे करायची असेल पहाटे करू शकता. दोन महिन्याचा कालावधी आहे. तुम्ही केवायसी दोन महिन्यामध्ये कधीही ही करू शकता.

त्यानंतर दुसरा प्रश्न विचारता, ते म्हणजे केवायसी नक्की कोणी करायची. आपली केवायसी करून घ्या. परंतु भरपूर जण असं विचारतात की केवायसी नक्की कोणी करायची. तर ज्यांना पैसे येत आहेत. त्यांनी सुद्धा केवायसी करायची आहे. आणि ज्यांचा हप्ता जून पासून जुलै पासून जे काही बंद झाले. असतील हप्ते त्यांनी सुद्धा केवायसी करायची आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्या लाडक्या बहिणींनी ज्यांनी फॉर्म भरलेले होते. ज्यांचे हप्ते बंद झाले होते, मधी ज्यांची ्यांचे हप्ते चालू आहेत, ज्यांना पैसे मिळत आहेत. सगळ्या लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करणं गरजेचं आहे. तरच जो काही लाभ आहे, तो चालू राहणार आहे.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे केवायसी करताना जे काही सरकारी कर्मचारीचा जो पर्याय आहे, आणि अविवाहित विवाहित असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. तिथे आम्ही होय निवडायचं का नाही. निवडायचं तर केवायसी करताना तुम्हाला दोन्ही ठिकाणी होय निवडायच आहे. जो पहिला प्रश्न आहे. तो जरा व्यवस्थित त्यांनी टाकलेला नाही, तर आपल्याला पहिला प्रश्न सुद्धा होय करायचा आहे. आणि दुसरा प्रश्न सुद्धा होय करायचा आहे. आणि आपली केवायसी करून घ्यायची. आता भरपूर लाडक्या बहिणी विचारतात. पुढचा प्रश्न तो म्हणजे होईच्या जागी नाही झालेल आता काय करायचं नक्की काय प्रॉब्लेम येईल तर आता तुम्हाला काही ऑप्शन नाहीये होयच्या जागी जर नाही झाला असेल तरी काही टेन्शन घेऊ नका.

New Voter id Card Online Apply 2025-26 Maharashtra New Process | नवीन मतदार ओळखपत्र ऑनलाइन अर्ज २०२५-२६ महाराष्ट्र नवीन प्रक्रिया ?
तुमच्या आधार कार्ड नंबर वरून कौटुंबिक माहिती असेल किंवा शासकीय कर्मचारी आहे. का त्यामुळे काही काळजी करू नका. तर आता काहीही पर्याय त्याच्यावरती नाही.
त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे केवायसी एडिट होते का? दुरुस्ती होते का केवायसी मध्ये तर मी तेच सांगितलं की केवायसी दुरुस्त आत्ता होत नाही.
जर यामध्ये काही बदल झाला एडिट करण्यासाठी काही ऑप्शन आला तर आपल्या पुढे सांगण्यात येईल. पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे भरपूर महिला असे म्हणतात की, आमच्या पतीच किंवा आमच्या वडिलांचा आधार नंबर कशासाठी घेतलाय? आता लक्षात ठेवा तुमचा जो काही आधार नंबर आहे, पती किंवा वडिलांचा आधार नंबर कशासाठी घेतलाय तर तो तुमचा आधार नंबर ट्रॅक केला जाणार आहे.
म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या किंवा तुमच्या वडिलांच्या नावावरती कायकाय गोष्टी आहे? गाडी आहे का? आयटीआर भरतायत का? शासकीय कर्मचारी आहे का? अजून काही गोष्टी असतील त्या सर्व ट्रॅक केल्या जाणार आहेत. आणि त्यासाठीच हा तुमच्या नवऱ्याचा किंवा तुमच्या वडिलांचा हा आधार नंबर जो आहे, तो घेतला जाणार आहे. आणि त्या त्याच्यावरून तुमच्या कुटुंबात नक्की काय काय गोष्टी आहेत, ते समजणार आहे.
आणि त्यामधून महिला अपात्र करण्यात येणार आहेत, त्यानंतर भरपूर महिला हा एक प्रश्न विचारतायत की एका घरामध्ये तीन महिला असतील तर केवायसी कशी करायची. तर एक गोष्ट लक्षात ठेवा. जीआर नुसार जर पाहिलं तर एक विवाहित आणि एक अविवाहित इथे पात्र आहे. आता तुमच्या घरामध्ये समजा दोन पेक्षा जास्त महिला असतील, तर तुम्ही काय करायचं फक्त दोनच केवायसी करू शकता. एक विवाहित जो कोण असेल महिला त्यांची केवायसी तुम्हाला करायची आहे.
आणि एक अविवाहित कोण असेल त्यांची केवायसी फक्त करायची आहे. एक अविवाहित आणि विवाहित बाकीच्यांची केवायसी करायची नाही, नाहीतर तुमच्या कुटुंबातील सगळे अपात्र ठरवल्या जातील. तीन चार महिला ज्या असतील सगळ्या अपात्र ठरवले जातील. त्यामुळे केवायसी करताना एक अविवाहित आणि एक विवाहित यांनी केवायसी करायची आहे. आणि केवायसी च्या ठिकाणी जे होय आहे.

दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय होय करायचा आहे. आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे भरपूर महिला विचारतायत की आमची केवायसी झालेली आहे का नाही ते कसं पाहायचं. आता ही तुमची केवायसी झाली का नाही कसं पाहायचं,
Ladki Bhaini Yojana KYC What documents are required ( Ladki Bhaini Yojana KYC What documents are required )
-
आधार कार्ड – लाभार्थी आधार कार्ड.
-
राहण्याचा पुरावा (Address Proof) – आधारवरच पत्ता असल्यास वेगळे कागदपत्र लागत नाही.
-
बँक पासबुक / खाते क्रमांक – ज्यात रक्कम जमा होणार आहे, ते खाते मुलीच्या नावावर असावे.
-
पालकांचा आधार क्रमांक / ओळखपत्र (गरजेनुसार).
-
जन्मतारीख दाखवणारे कागदपत्र – जन्म दाखला / शाळेचा दाखला.
How to do e-KYC for Ladki Bahin Yojana ( लाडकी बहिण योजनेची ई केवायसी कशी करावी )
तर तुम्हाला प्रथम या ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc ) वेबसाईट वर येयच आहे.आणि जिथे तुम्ही केवायसी केलेली आहे. त्याच वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि संमती एक्सेप्ट करून तुम्हाला ओटीपी पाठव वरती क्लिक करायच आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला तिथे दाखवलं जाईल की, तुमची केवायसी ही ऑलरेडी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा केवायसी करायची गरज नाही.असं दाखवलं जाईल म्हणजे, तुमची केवायसी झालेली आहे का, नाही. हे तुम्ही इथे चेक करू शकता.
जिथे तुम्ही केवायसी केली त्याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आणि तुमची केवायसी झालेली आहे का, नाही. ते तुम्हाला कळून जाईल. तर महत्त्वपूर्ण हे प्रश्न होते हे प्रश्नांची उत्तर आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
Conclusion
तर मित्रानो आपणास मी असे सांगू शकतो कि, ह्या मध्ये जी माहिती दिली आहे. New Ladki bahin eKYC answers to your questions ती संपूर्ण माहिती आम्ही लाडकी बहिन eKYC तुमच्या प्रश्नांची माहिती तुम्हाला दिली आहे. तर आपण असे सांगू शकतो कि, काही लाडकी बहिणींची नवीन नवीन शंका असते, किंवा त्या प्रश्नाचे त्यांना उत्तर पण मिळत नाही. म्हणून आम्ही असे आपणास सांगू शकतो कि जे काही प्रश्न आहेत. ते सर्व माहिती तुम्हाला आम्ही सांगितली आहे. तुम्ही हि kyc घरी पण बसून करू शकता, पण, जर तुम्हाला kyc बद्दल जर काही समजले नाही तर तुम्ही तुम्ही महा ई सेवा केंद्र मधून kyc करू शकता.
